तीन देवीयां
जेव्हा केव्हा आमची सहल ठरते तेव्हा सहलीचे ठिकाण ठरायच्या आधी येणार्यामध्ये आमच्या वैशाली, निलिमा आणि तेजा नक्की असतात. त्यांच्या शिवाय कुठलीही सहल आयोजित होऊ शकत नाही. त्यांचा उत्साह बघून आमच्यासारखे न येण्यासाठी छोटेमोठे कारण देणारे सुद्धा हतबल होतो. घरच्या माणसांची योग्य सोय व्यवस्था करून आपल्या प्लॅनिंग आणि टाइम मॅनेजमेंटच उत्कृष्ट उदाहरण देतात. कठीण असतं हो इतकं सर्व मॅनेज करण. पण त्या लीलया आपली जबाबदारी पार पाडतात. कधी जायचं, कुठे फिरायला जायचं, परत कधी निघायचं या सारखी बारीकसारीक योजना त्या बेमालूमपणे ठरवतात. मनमोकळा स्वभाव, सर्वांशी मिळून मिसळून राहणे व वागणे, शक्य होईल तितक्या जणांना सामावून घेणे हे तिघांच्याही स्वभावाच वैशिष्ट्य.
अश्या शालेय मैत्रिणी सगळ्यांना लाभो.
आजच्या महिलादिनी समस्थ महिला वर्गाला हार्दिक शुभेच्छा.
व्यक्त व्हावंस वाटलं म्हणून.....
ब्रह्मेश नाडकर्णी
No comments:
Post a Comment