Saturday, March 29, 2025

वऱ्हाड निघालं कणकवलीला 26.2.2025

 

माझ्या मुलीच्या लग्नाला आलेले असताना तिथे हॉलवरच "राजा आणिक राणी " फेम राजेश आणि सौ. प्रियाने त्यांच्या मुलाच्या कपिलेशच्या लग्नाचे आमंत्रण आम्हा उपस्थित मित्र मैत्रिणींना दिले. लगेच सौ. तेजाने लग्नाच्या ते तीन दिवस आधी आम्हाला तिच्या मसुरे येथील वाडीवर येण्याचे आमंत्रण दिले. फेब्रुवारी २६ ते मार्च या काळात कणकवलीला असताना कपिलेशची २८ ला हळद आणि मार्चला लग्न नंतर मार्चला परत मुंबईला असा भरभक्कम बेत आखला.

 

यथासांग वंदेभारतचे येण्याजाण्याचे तिकीट काढून आम्ही सज्ज झालो. मी सलीलला अंधेरीला आणि वैशालीला माहीमला पिकअप करायचे ठरले. २६ फेब्रुवारी महाशिवरात्रीला पहाटे .२५ ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरुन नीलिमा आणि .३५ ला दादरला सलील, वैशाली, साईप्रसाद आणि मी ट्रेन पकडायची असा बेत ठरला. प्लॅटफॉर्मवर भेटून आम्ही गप्पा मारण्यात दंग झालो. बाकी नॉर्मल गाड्यांपेक्षा वंदेभारत ट्रेन कॉम्पॅक्ट आणि मोजके डबे यामुळे आम्ही थांबलो होतो त्या ठिकाणापासून बरीच पुढे थांबली. मग काय आमचे सामान उचलून आम्ही आमच्या डब्याकडे धाव घेतली आणि एकदाची आमची जागा पटकावली. बसल्या बसल्या जागांची थोडीशी अदलाबदल केल्यानंतर वैशाली नीलिमा आणि साई सलील मी एकत्र आलो. ठाणे येता येता वेलची पूड असलेला चहा आणि बिस्किटे आली. पुढे पनवेल गेल्यावर खेड येताच गरमागरम कटलेट, उपमा, ब्रेड, जाम, बटर आणि चहा आला. आलिशान वंदेभारत गाडीतून निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत गप्पा मारता मारता रत्नागिरी कधी आलं कळलंच नाही.






कणकवलीला गाडी वेळेच्या आधीच पोहोचली. स्टेशन बाहेर येताच राजेश, प्रिया अन कपिलेश यांनी आमचे जोरदार स्वागत करून सुखाचा धक्का दिला. त्यांचा निरोप घेऊन आम्ही नीलिमाच्या ओळखीचे एक विरणला राहत होते. त्यांच्या बंगल्यावर थोड्या वेळासाठी गेलो. तिथल्या नारळाच्या झाडाखाली सलीलने फोटो काढले. तेजा आणि तिचे यजमान आमची वाट बघतच होते. त्यांचे घर आणि आजूबाजूचा परिसर बघून डोळे दिपले. दुपारच्या जेवणाला मटकीची उसळ, ओल्या काजूची भाजी, साबुदाण्याचे पापड, डाळ, भात काकडी अन मुळा यांचे काप...वाह अप्रतिम जेवण





संध्याकाळी आम्ही जवळच असलेल्या शंकराच्या देवळात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले. तसेच माऊली देवीचे दर्शन घेतले. माऊली देवी म्हणजे वारुळ असलेले मंदीर. परिसरात किमान गर्दी आणि शांत वातावरण असल्यामुळे आमचे देवदर्शन छान झाले. त्या तिथून आम्ही आचरा समुद्रकिनाऱ्यावर सूर्यास्ताच्या आधी पोहोचलो. अस्ताला जाणार्या सूर्याचे विहंगम दृश्य पाहून मन भरून आले. रात्री जेवताना ताकातल्या बारीक मिरच्या तळलेल्या होत्या त्यामुळे तोंडाला चव आली









No comments:

Post a Comment

आज गुरूवार २७ फेब्रुवारी (kankavli)

  आज गुरूवार २७ फेब्रुवारी   न्याहारीला आंबोळी आणि कोथिंबिरीची चटणी असा फक्कड बेत होता . आंघोळी करून जुआ बेट जाण्यासाठी ...