Sunday, July 5, 2026

गौतम सुरेश आंगणे.


 रोल नंबर एक अशी प्राथमिक ओळख असलेला कनकयोग १९८२ चा विद्यार्थी म्हणजे गौतम सुरेश आंगणे. पिंगट छटा असलेल्या डोळ्यांमुळे भारी व्यक्तिमत्त्वाचा धनी. खाऊन पिऊन सुखी असलेला आनंदी जीव. निवडक मित्रांच्या घोळक्यात रमलेला. वयामानाने स्थूल शरीरयष्टी असल्याने त्याला दातओठ खात अंगावर धावत येत असताना मध्ये पडायची  कोणाची हिम्मत नसे. खरतर एखाद्या जोकनंतर त्याने दिलेली टाळी टाळणे शहाण्या माणसाचे लक्षण होते. राज ठाकरेचा सख्खा शेजारी असल्यामुळे असेलही. सात मजली हसून दिलखुलास दाद द्यायची तर गौतमनेच. 


लग्नानंतर त्याने ठाण्याला बस्तान बसवले. हॉटेल्स, फॅक्टरी आणि इंडस्ट्रीज यामध्ये क्लोरीनेशन तसेच संलग्न गोष्टी यामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी.

रोल नंबरने आपली अनोखी ओळख जोपासणाऱ्या गौतमला आज दिनांक ५ जुलै २०२६ रोजी ६० वर्षे पूर्ण झाल्यामुळे  कनकयोग १९८२ तर्फे अभिनंदन. पुढच्या निरोगी आयुष्यासाठी गौतमला कनकयोग मित्र मैत्रिणींकडून खूप सार्‍या शुभेच्छा.

1 comment:

  1. ब्रम्हा ,तुला कनक योगाचा महर्षी व्यासच म्हणायला हवे!!! किती संवेदनशीलतेने माणसं वाचतोस तू आणि तितक्याच संवेदनशीलतेने रेखाटतोसही. कळस म्हणजे या शब्दकुसुमांचा बारमाही बहर!!! प्रत्येकाच्या वाढदिवशी तुझी शब्दचित्र तयार .मनाच्या कोपऱ्यात आपल्या सर्वांच्या किती छान आठवणी जपल्यास तू .इतक्या वर्षांनी प्रत्येकाची व्यक्तिचित्र रेखाटने केवळ कमाल !!!! अनेक पुष्पगुच्छ बाजूला आणि तुझी शब्दकुसुमं एकीकडे ,अर्थात ही तुलना नाही...
    वैयक्तिक रित्या माझ्याकडून आणि समस्त कनक योगाकडून तुला मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏 शिवाय मंडळी आपण दिलेल्या शुभेच्छांचा आदरपूर्वक स्वीकार🙏🙏

    ReplyDelete

गौतम सुरेश आंगणे.

  रोल नंबर एक अशी प्राथमिक ओळख असलेला कनकयोग १९८२ चा विद्यार्थी म्हणजे गौतम सुरेश आंगणे. पिंगट छटा असलेल्या डोळ्यांमुळे भारी व्यक्तिमत्त्वाच...