Sunday, July 5, 2026

गौतम सुरेश आंगणे.


 रोल नंबर एक अशी प्राथमिक ओळख असलेला कनकयोग १९८२ चा विद्यार्थी म्हणजे गौतम सुरेश आंगणे. पिंगट छटा असलेल्या डोळ्यांमुळे भारी व्यक्तिमत्त्वाचा धनी. खाऊन पिऊन सुखी असलेला आनंदी जीव. निवडक मित्रांच्या घोळक्यात रमलेला. वयामानाने स्थूल शरीरयष्टी असल्याने त्याला दातओठ खात अंगावर धावत येत असताना मध्ये पडायची  कोणाची हिम्मत नसे. खरतर एखाद्या जोकनंतर त्याने दिलेली टाळी टाळणे शहाण्या माणसाचे लक्षण होते. राज ठाकरेचा सख्खा शेजारी असल्यामुळे असेलही. सात मजली हसून दिलखुलास दाद द्यायची तर गौतमनेच. 


लग्नानंतर त्याने ठाण्याला बस्तान बसवले. हॉटेल्स, फॅक्टरी आणि इंडस्ट्रीज यामध्ये क्लोरीनेशन तसेच संलग्न गोष्टी यामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी.

रोल नंबरने आपली अनोखी ओळख जोपासणाऱ्या गौतमला आज दिनांक ५ जुलै २०२६ रोजी ६० वर्षे पूर्ण झाल्यामुळे  कनकयोग १९८२ तर्फे अभिनंदन. पुढच्या निरोगी आयुष्यासाठी गौतमला कनकयोग मित्र मैत्रिणींकडून खूप सार्‍या शुभेच्छा.

संध्या घाग

 

संध्या घाग ही आपल्या कनकयोग १९८२ ची विद्यार्थिनी. चित्रकलेत पारंगत. लहानपणापासून सशक्त शरीरयष्टी (athletic built) असल्याने मैदानी खेळात तरबेज. ठराविक मैत्रिणींबरोबर रमणारी. पदवीनंतर काही वर्षे अभ्युदय बॅंकेत काम करत होती. लग्नानंतर श्वेता साळवी. १९९३ सालापासून अमेरिकेत स्थायिक. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये कार्यरत. बँकेतून IT मध्ये आणि ते पण दुसर्‍या व प्रगत देशात हे खरंच कौतुकास्पद आहे. फोटो पाहिला की कळतं संध्या अजूनही तशीच आहे. अगदी शाळेतल्या मुलीसारखी स्लीम आणि ट्रीम. सहाजिकच मुंबईत आली तरी तिची धावती भेट असते. 

आज दिनांक ४ जूलै रोजी संध्याला साठ वर्षे पूर्ण झाल्यामुळे अभिनंदन. नियमित कामाबरोबर कौटुंबिक कर्तव्ये पार पाडण्यासाठी, छंद जोपासण्यासाठी तसेच निरोगी आयुष्यासाठी संध्याला कनकयोगतर्फे खूप सार्‍या शुभेच्छा.

मनोज धनेश्वर दवणे

 
मनोज धनेश्वर दवणे हा आपल्या कनकयोग १९८२ चा विद्यार्थी. त्याचा वाढदिवस वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये पहिला असे. टपोरे हस्ताक्षर ही त्याची ओळख. क्रिकेट या  खेळात गोलंदाज म्हणून स्वतःची छाप पाडल्यामुळे वर्गाच्या आणि शाळेच्या क्रिकेट संगात वर्णी लागली होती. पदवी हातात मिळण्याआधी गळ्यात वरमाला पडल्यामुळे बाबा तसेच आजोबा या पदव्या मनोज दिमाखाने मिरवत असतो. किंचित टच अप केलेल्या काळेभोर केसांचा उल्लेख केल्यावर लाजलेल्या मनोजचा उजळलेला चेहरा बघण्यासारखा होता. त्याने कारकिर्दीची सुरुवात Cox & Kings ने करून जगातील बहुतेक सर्व प्रमुख देश तसेच पूर्ण भारत पालथा घातला आहे.

आज दिनांक २ जूलै रोजी एकसष्ट वर्षे पूर्ण झाल्यामुळे मनोजचे मनःपूर्वक अभिनंदन. Evergreen मनोजला निरोगी आयुष्यासाठी कनकयोगतर्फे खूप सार्‍या शुभेच्छा.

प्रसाद नारायण धुरी


 प्रसाद नारायण धुरी आपल्या कनकयोग १९८२ चा विद्यार्थी. प्रसादला अजूनही विद्यार्थी म्हणण्याचे कारण की दहावीला त्याला जसं पाहिले होते तो अजूनही अगदी तसाच आहे. सुबक हस्ताक्षराचा मानकरी असा हा प्रसाद स्वभावाने लाजरा बुजरा असल्यामुळे आणि कोणाच्या अध्यात मध्यात नसल्याने ठराविक मित्रांत रमलेला असायचा. पदवी हाती आल्याआल्या तो अभ्युदय बँकेत रुजू झाला. प्रसाद अभ्युदय बँकेत ३८ वर्षे २ महिने पूर्ण करून ह्या महिन्याअखेर डोंबिवली शाखेतून निवृत्त होत आहे. आज दिनांक २३ जून रोजी त्याला साठ वर्षे पूर्ण झाल्यामुळे अभिनंदन. याउप्पर प्रसादला कौटुंबिक कर्तव्ये पार पाडण्यासाठी, छंद जोपासण्यासाठी तसेच निरोगी आयुष्यासाठी कनकयोगतर्फे खूप सार्‍या शुभेच्छा.


Wednesday, April 2, 2025

आज गुरूवार २७ फेब्रुवारी (kankavli)

 

आज गुरूवार २७ फेब्रुवारी

 

न्याहारीला आंबोळी आणि कोथिंबिरीची चटणी असा फक्कड बेत होता. आंघोळी करून जुआ बेट जाण्यासाठी आम्ही निघालो. गड नदीतील हे बेट म्हणजे अनेक छोट्या छोट्या बेटांचा समूह. तेथील एका बेटावर बागवे यांचे मित्र तात्या खोत यांचे स्वामी कृपा होम स्टे अँड बोटिंग आहे. खोत यांची बोट आमच्या स्वागताला उभी होती. तात्यांनी त्यांच्या बोटीने आम्हाला जवळ जवळ एक तास फेरफटका मारवला. कांदळवन म्हणजे तिवराची जंगलं किंवा खारफुटी. इंग्लिशमध्ये याला Mangroves असं म्हटलं जातं. हा एक साधारण 80 वनस्पतींचा गट आहे ज्या समुद्रकिनाऱ्यालगत वाढतात. अशी बरीचशी छोटी वनस्पती आम्हाला दिसून आली. रहिवाशांसाठी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या अनेक उपाययोजनांपैकी दोन आमच्या निदर्शनास आल्या. पहिली खेकडापालन जे काही निळ्या रंगाच्या ड्रममध्ये आम्हाला दिसून आले आणि दुसरे शिनाने शिंपले....Shinane fish, one of theclam also known as Singhara or Seenghala fish, offers several health benefits, including being a good source of protein, omega-3 fatty acids, and essential nutrients like choline, which are beneficial for heart, brain, and overall health. या दोन्हीचे उपक्रम आम्हाला बोटीतून दिसले. तीरावर आल्यावर आम्ही पोपाये येथील अमेय खानावळीत शाकाहारी थाळी जेवलो. आज गुरुवार असल्यामुळे खानावळीत मांसाहार नव्हता. नीलिमाची मैत्रीण जवळच राहत होती. आम्ही तिच्याकडे श्री आदी देवता वेताळ मुंजेश्वरप्रसन्न सुवर्ण बाग याठिकाणी गेलो. तिने खास बनवलेल्या गरमागरम बटाटेवडे लसणीची सुकी लाल चटणी आणि चहा यांचा आस्वाद घेऊन आम्ही तृप्त झालो. आम्ही फेरफटका मारता मारता आंब्याची झाडे, मिरचीची रोपटे, मुळा आणि इतर अनेक झाडे पाहिली. तिथून आम्ही मालवणला साळगावकर यांच्या गणपतीचे दर्शन घेतले. नुकतीच संध्याकाळची आरती झाली होती. देवळात तुरळक वर्दळ होती. गणपती बाप्पाचे

दर्शन मनसोक्तपणे घेता आले. नंतर आम्ही मालवण जेट्टीला गेलो पण काळोख असल्यामुळे परत फिरलो. मार्केटजवळ असलेल्या रापण रियासत यात्री निवास येथे शाकाहारी थाळीमध्ये वाटण्याची भाजी, पालेभाजी, डाळ, भात, सोलकढी, गुलाबजाम आणि आम्ही कोलंबी मसाला,भाजलेली सुरमई, बांगड्याच कालवण आणि भाजलेली सौंद्याळी यावर ताव मारला. तिथल्या एका आयस्क्रीम पार्लरमध्ये आम्ही कुल्फी फालुदा तर साईप्रसादने त्याचा आवडता मस्तानी फालुदा चाखला. परत येताना खूप उशीर झाला पण दिवस छान गेला. 









गौतम सुरेश आंगणे.

  रोल नंबर एक अशी प्राथमिक ओळख असलेला कनकयोग १९८२ चा विद्यार्थी म्हणजे गौतम सुरेश आंगणे. पिंगट छटा असलेल्या डोळ्यांमुळे भारी व्यक्तिमत्त्वाच...