
मनोज धनेश्वर दवणे हा आपल्या कनकयोग १९८२ चा विद्यार्थी. त्याचा वाढदिवस वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये पहिला असे. टपोरे हस्ताक्षर ही त्याची ओळख. क्रिकेट या खेळात गोलंदाज म्हणून स्वतःची छाप पाडल्यामुळे वर्गाच्या आणि शाळेच्या क्रिकेट संगात वर्णी लागली होती. पदवी हातात मिळण्याआधी गळ्यात वरमाला पडल्यामुळे बाबा तसेच आजोबा या पदव्या मनोज दिमाखाने मिरवत असतो. किंचित टच अप केलेल्या काळेभोर केसांचा उल्लेख केल्यावर लाजलेल्या मनोजचा उजळलेला चेहरा बघण्यासारखा होता. त्याने कारकिर्दीची सुरुवात Cox & Kings ने करून जगातील बहुतेक सर्व प्रमुख देश तसेच पूर्ण भारत पालथा घातला आहे.
आज दिनांक २ जूलै रोजी एकसष्ट वर्षे पूर्ण झाल्यामुळे मनोजचे मनःपूर्वक अभिनंदन. Evergreen मनोजला निरोगी आयुष्यासाठी कनकयोगतर्फे खूप सार्या शुभेच्छा.
No comments:
Post a Comment