आज गुरूवार २७ फेब्रुवारी
न्याहारीला आंबोळी आणि कोथिंबिरीची चटणी असा फक्कड बेत होता. आंघोळी करून जुआ बेट जाण्यासाठी आम्ही निघालो. गड नदीतील हे बेट म्हणजे अनेक छोट्या छोट्या बेटांचा समूह. तेथील एका बेटावर बागवे यांचे मित्र तात्या खोत यांचे स्वामी कृपा होम स्टे अँड बोटिंग आहे. खोत यांची बोट आमच्या स्वागताला उभी होती. तात्यांनी त्यांच्या बोटीने आम्हाला जवळ जवळ एक तास फेरफटका मारवला. कांदळवन म्हणजे तिवराची जंगलं किंवा खारफुटी. इंग्लिशमध्ये याला Mangroves असं म्हटलं जातं. हा एक साधारण 80 वनस्पतींचा गट आहे ज्या समुद्रकिनाऱ्यालगत वाढतात. अशी बरीचशी छोटी वनस्पती आम्हाला दिसून आली. रहिवाशांसाठी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या अनेक उपाययोजनांपैकी दोन आमच्या निदर्शनास आल्या. पहिली खेकडापालन जे काही निळ्या रंगाच्या ड्रममध्ये आम्हाला दिसून आले आणि दुसरे शिनाने शिंपले....Shinane fish, one of theclam also known as Singhara or Seenghala fish, offers several health benefits, including being a good source of protein, omega-3 fatty acids, and essential nutrients like choline, which are beneficial for heart, brain, and overall health. या दोन्हीचे उपक्रम आम्हाला बोटीतून दिसले. तीरावर आल्यावर आम्ही पोपाये येथील अमेय खानावळीत शाकाहारी थाळी जेवलो. आज गुरुवार असल्यामुळे खानावळीत मांसाहार नव्हता. नीलिमाची मैत्रीण जवळच राहत होती. आम्ही तिच्याकडे श्री आदी देवता वेताळ मुंजेश्वरप्रसन्न सुवर्ण बाग याठिकाणी गेलो. तिने खास बनवलेल्या गरमागरम बटाटेवडे व लसणीची सुकी लाल चटणी आणि चहा यांचा आस्वाद घेऊन आम्ही तृप्त झालो. आम्ही फेरफटका मारता मारता आंब्याची झाडे, मिरचीची रोपटे, मुळा आणि इतर अनेक झाडे पाहिली. तिथून आम्ही मालवणला साळगावकर यांच्या गणपतीचे दर्शन घेतले. नुकतीच संध्याकाळची आरती झाली होती. देवळात तुरळक वर्दळ होती. गणपती बाप्पाचे
दर्शन मनसोक्तपणे घेता आले. नंतर आम्ही मालवण जेट्टीला गेलो पण काळोख असल्यामुळे परत फिरलो. मार्केटजवळ असलेल्या रापण रियासत यात्री निवास येथे शाकाहारी थाळीमध्ये वाटण्याची भाजी, पालेभाजी, डाळ, भात, सोलकढी, गुलाबजाम आणि आम्ही कोलंबी मसाला,भाजलेली सुरमई, बांगड्याच कालवण आणि भाजलेली सौंद्याळी यावर ताव मारला. तिथल्या एका आयस्क्रीम पार्लरमध्ये आम्ही कुल्फी फालुदा तर साईप्रसादने त्याचा आवडता मस्तानी फालुदा चाखला. परत येताना खूप उशीर झाला पण दिवस छान गेला.